
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. खलनायकी भूमिका असो किंवा विनोदी त्यांनी प्रत्येकच भूमिका इतक्या उत्तम पद्धतीने साकारली की त्या भूमिका अजरामर ठरल्या. त्यांची विशेष जोडी जमली ती अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत. मराठी सिनेसृष्टीतील दोन हिरे म्हणून या जोडीची ओळख होती. मात्र लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर ही जोडी तुटली. लक्ष्मीकांत यांचं निधन हा आपल्यासाठी मोठा धक्का होता असं अशोक सराफ त्यांच्या मुलाखतीत म्हणाले आहेत.