
छोटा पडदा आणि मोठा पडदा गाजवणारे मराठी सिनेसृष्टीचे दोन लोकप्रिय चेहरे म्हणजे अशोक सराफ आणि प्रशांत दामले. अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीचे मामा आहेत. प्रेक्षक त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतात. तर नुकताच त्यांचा पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला. मराठी सिनेसृष्टीतील बच्चन म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र मराठी सिनेसृष्टीत, मराठी भाषेत काम करूनही अशोक सराफ यांनी मराठी मुद्द्यावर बोलण्यास नकार दिला. तीच परिस्थिती प्रशांत दामले यांचीही आहे. त्यांनीही या विषयावर बोलायला नकार दिला.