
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अवलिया कलाकार म्हणजे अशोक सराफ. गेली कित्येक वर्ष ते सिनेसृष्टीमधे पाय घट्ट रोवून उभे आहेत. अशोक सराफ यांचा ४ जून रोजी वाढदिवस आहे. त्यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. अशोक मामांनी प्रेक्षकांना पोटधरून हसवलं. त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी विनोदीसोबतच गंभीर भूमिकादेखील तितक्याच ताकदीने केल्या. मात्र मामांच्या आयुष्यातदेखील अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांचे डोळे आजही पाणावतात. अशीच एक घटना त्यांनी त्यांच्या मी बहुरूपी या आत्मचरित्रात लिहिली आहे.