
छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे लोकप्रिय मराठी अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या अभिनयातील कारकिर्दीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांनी अनेक चित्रपट आणि नाटकात काम केलंय. मराठीसोबतच हिंदीमध्येही त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. सध्याहिते कलर्स मराठीवरील 'अशोक मा. मा.' या मालिकेत काम करताना दिसतायत. अशोक सराफ आता ७८ वर्षांचे झाले आहेत. तरीही त्यांची काम करण्याची एनर्जी वाखाणण्याजोगी आहे. आता नुकताच अशोक सराफ यांना ते रिटायर कधी होणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मामा काय म्हणाले पाहूया.