
अशोक सराफ... नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर उभा राहतो एक हसमुख चेहरा, धमाल विनोद, गावरान माणुसकीनं ओतप्रोत भरलेला कलाकार आणि आता त्याच्या नावापुढे लागलीय एक खास ओळख "पद्मश्री अशोक सराफ" भारत सरकारकडून नुकताच त्यांना "पद्मश्री" पुरस्कार मिळाला आणि तोही फक्त पडद्यावरच्या कलाकृतींसाठी नाही, तर त्यांच्या अभिनयामधून घडलेल्या संवेदनशील, माणसासाठी! हा पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा कलाकार फक्त अभिनय करत नाही, तर जनतेच्या हृदयात आपली जागा बनवतो. मुळात नुसतं स्टार होणं सोपं असतं, पण “मामा” बनून घराघरात माणसाच्या मनात घर करणं हे फक्त अशोक सराफसारख्या कलाकारालाच जमलं. म्हणून त्यांच्या कलेला मानवंदना देऊन अल्ट्रा झकास घेऊन आलंय ‘अशोक मामा चित्रपट महोत्सव'.