

amit shinde
esakal
रंगमंच,मालिका, चित्रपट अशा तीनही माध्यमांमध्ये अभिनेता अशोक शिंदे यांनी विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता ‘केस नं.७३’ या आगामी चित्रपटातून ते एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. चित्रपटात मनोवैज्ञानिक डॉ.श्रीकांत ही व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अशोक शिंदे बऱ्याच काळानंतर मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. अशोक शिंदे यांनी आजवरच्या अभिनय प्रवासात आपल्या अष्टपैलूत्वाने विविध भूमिकांमध्ये रंग भरले आहेत.