
छत्रपती संभाजीनगर : ‘लगान’ आणि ‘स्वदेस’ हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे आणि काळाचे होते. दोन्ही सिनेमांचे जॉनर वेगळे होते. देशाबद्दल मला प्रेम आहे. पण माझे देशावरचे हे प्रेम मी कसे दाखवू शकतो, असा विचार आला आणि ‘स्वदेस’ बनला. दोन्ही चित्रपटांनी आमिर व शाहरुख यांची अगोदरची इमेज पूर्णपणे बदलली, असे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणाले.