
अडीच वर्षानंतर अखेर वात्सल्य आश्रम केस संपली. त्यात साक्षी आणि प्रिया दोघीही जेलमध्ये गेल्या. त्याचा धक्का किल्लेदार आणि सुभेदार या दोन्ही कुटुंबांना बसलाय. मात्र साक्षी आणि प्रिया दोघीही आत गेल्यानंतर आता पुढे मालिकेत काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. एकीकडे पुर्णा आजीला प्रियाच्या वागण्याचा धक्का बसला तर दुसरीकडे रविराजदेखील प्रियाच्या वागण्याला कंटाळून एक निर्णय घेतोय. नेमकं मालिकेत काय सुरु आहे?