
आपल्या अभिनयाच्या आणि आवाजाच्या जोरावर बॉलिवूड गाजवणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री अश्विनी काळसेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 'जोधा अकबर', 'जॉनी गद्दार', 'गोलमाल अगेन', कसम से' अशा अनेक चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत आपली जागा निर्माण केली. खलनायिका ते विनोदी भूमिका त्यांनी अत्यंत ऊत्तम पद्धतीने पार पाडल्या. मात्र अश्विनी यांची एक दुखरी नस आहे. त्यांचं आजारपण त्यांच्या आई होण्यामध्ये अडसर ठरतंय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही गोष्ट सांगितलीये.