
Marathi Entertainment News: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्यांचे फॉलोवर्सदेखील प्रचंड आहेत. मात्र ते अनेकदा त्यांच्या रिल्समुळे ट्रोल होताना दिसतात. त्यांचे हावभाव आणि डान्स कधी कधी टीकेचा धनी ठरतो. मात्र त्यांच्या या वागण्याचा दोष त्यांच्याइतकाच अभिनेत्री अश्विनी कासारला देखील दिला गेला. अश्विनी अनेकदा त्यांच्यासोबत रिल्समध्ये दिसते. त्यामुळे तिने या दोघांना नादाला लावलं या शब्दात तिच्यावर टीका केली गेली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने यावर प्रतिक्रिया दिलीये.