
'ठरलं तर मग' मालिकेतील अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडे नुकतीच आई झालीये. तिने १५ मार्च रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. मात्र मोनिकाने एका महिन्याआधीच आपल्या बाळाची डिलिव्हरी करून घेतलीये. मोनिकाची डिलिव्हरी एप्रिल महिन्यात होणार होती. पण, काही कारणांमुळे डॉक्टरांनी तिला लवकर डिलिव्हरी करण्याचा सल्ला दिला. यामागचं कारण मोनिकाने तिच्या युट्यूब व्हिडिओवरुन चाहत्यांना सांगितलं आहे.