
'ठरलं तर मग' ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. ही मालिका टीआरपी यादीतही पहिल्या क्रमांकावर आहे. यातील सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. सध्या मालिकेत ३० दिवसांचं चॅलेंज सुरू आहे. कोर्टाने अर्जुनला मधुभाऊंच्या केससाठी फक्त ३० दिवस दिले आहेत. त्यामुळे त्याचं अर्ध लक्ष त्या केसकडे आहे. तर घरात प्रियाचे वेगळेच चाळे सुरू आहेत. ती सायलीला त्रास देण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. मात्र त्यामुळेच अस्मिताला आता प्रियाचा खरा चेहरा समजलाय.