

atul parchure
esakal
छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेले दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपटात काम केलं. त्यांनी विनोदी भूमिकांसोबतच गंभीर भूमिकाही उत्तमरीतीने साकारल्या. मात्र १४ ऑक्टोबर २०२४ रोजी अतुल यांचं कर्करोगाने निधन झालं. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला. यात त्यांनी त्यांच्या आयुष्याचा अनुभव सांगितलेला. त्यांनी त्यांच्या आयुष्यात कटू अनुभव घेतल्यानंतर ती शिकवण आपल्या प्रेक्षकांना दिली होती. ही शिकवण तुम्हाला या वर्षी नक्की कमी येईल. संजय मोने यांच्या झी मराठीवरील 'कानाला खडा या कार्यक्रमात ते बोलत होते.