
२०२४ संपायला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. तर नवीन वर्षाचं स्वागत करायला सगळे सज्ज होतायत. मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत केलं जाईल. मात्र सिनेसृष्टीतील अशी काही कुटुंब असतील ज्यांच्यासाठी पुढील वर्ष सारखं नसेल. कारण त्यांनी त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला गमावलंय. २०२४ मध्ये सिनेसृष्टीची प्रचंड हानी झाली. सिनेसृष्टीने एक दोन नव्हे तर तब्बल ९ कलाकार गमावले आहेत. हे कलाकार प्रेक्षकांना कायमचे सोडून गेलेत. त्यात मराठी सिनेसृष्टीतील २ कलाकारांचा समावेश आहे.