

MI SANSAR MAZA REKHITE SERIAL TROLL
ESAKAL
गेल्या काही महिन्यात अनेक नव्या मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. य मालिकांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या घटनांचा, सीनचा नकळतपणे प्रेक्षकांवरही परिणाम होत असतो. त्यामुळे मालिकांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या चुकीच्या गोष्टींचा नेटकरी नेहमीच विरोध करताना दिसतात. अशाच एका मालिकेचा नेटकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जातोय. ही मालिका आहे सन मराठी वाहिनीवरील मी 'संसार माझा रेखिते'. मालिकेत अभिनेता हरीश दुधाडे आणि अभिनेत्री दीप्ती केतकर मुख्य भूमिकेत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोवरून नेटकऱ्यांनी आता वाहिनीला सुनावलंय.