
छोट्या पडद्यावर अनेक मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यात. सध्या सुरू असलेल्या अनेक मालिकांच्या कथानकांवर प्रेक्षक नाराज आहेत. त्यात स्टार प्रवाहावरील अंक मालिकांचा समावेश आहे. आता 'मुरांबा' या मालिकेवर प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत. त्यात दाखवण्यात आलेल्या सीनवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतलाय. ती गरोदर असताना असं कथानक दाखवण्याचा अर्थ काय असा प्रश्न आता प्रेक्षक विचारत आहेत.