

कथा त्यांच्या आत्मसन्मानाची, कथा आपल्या आत्मभानाची, स्वच्छ, देखण्या, निरोगी भारताची, पृथ्वी लख्ख करणाऱ्या दूतांची... अशा टॅगलाईनसह आलेल्या 'अवकारीका' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर हातात झाडू घेऊन एक स्वच्छता दूत अगतिकपणे उभा असल्याचे दिसतंय. स्वच्छतेच्या माध्यमातून स्वतःच्या जगण्याचा रस्ता शोधणाऱ्या वेदनेचा हा शोध असला तरी समाजाला त्यांच्या श्रमाची जाणीव व्हावी, स्वच्छतेची प्रभावीपणे जागरूकता निर्माण व्हावी याच संकल्पनेतून आणि भावनेतून 'अवकारीका’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.