
सामाजिक भान जपणारे दिग्दर्शक अरविंद भोसले यांची नवी कलाकृती म्हणजे 'अवकारीका' चित्रपट. स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी मांडणी झाली ती नाट्य सादरीकरणातून. रवींद्र नाट्यमंदिरातल्या रंगमंचावर रंगलेल्या बहारदार पथनाट्याने रसिकांची मने जिंकली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वच्छतेचं पथनाट्य सादर करीत पहिल्यांदाच अनोख्या पद्धतीने 'अवकारीका' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा रंगला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक मा. श्री कृष्णप्रकाशजी आवर्जून उपस्थित होते.