

bandhini
esakal
मराठी चित्रपटांमध्ये स्त्री-केंद्री आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या आशयघन सिनेमांची एक मोठी आणि समृद्ध परंपरा आहे. हीच उज्ज्वल परंपरा पुढे नेण्यासाठी 'बंधिनी' हा नवा मराठी चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा भव्य पोस्टर अनावरण सोहळा संपूर्ण टीमच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.