
आता २०२४ हे वर्ष संपायला आलंय. यावर्षी अनेक नवीन गोष्टी घडल्या. काहींसाठी हे वर्ष खूप खास गेलं तर काहींसाठी कठीण काळ दाखवणारं ठरलं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने या वर्षाला निरोप दिलाय. या वर्षी त्यांना आवडलेल्या काही चित्रपटांची यादी त्यांनी शेअर केलीये. त्यात एका मराठी अभिनेत्रीच्या सिनेमाचा देखील समावेश आहे. आपल्या चित्रपटाचं नाव वाचून अभिनेत्रीचा आनंद अनावर झालाय. कोणते आहेत हे चित्रपट वाचा यादी.