%20(2).jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलय. बिग बॉस मराठीचं नवं सीझन सुरु होऊन जवळपास एक महिना उलटलाय आणि या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं चांगलीच रंगत आणलीय. यंदाच्या सीझनचा प्रत्येक एपिसोड हा चर्चेचा विषय ठरतोय. यंदाच्या सीझनमधील स्पर्धक असतील किंवा नवा होस्ट रितेश देशमुख सगळ्याच गोष्टी हटके आहेत. रितेश देशमुखचा भाऊचा धक्काही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. यातच घरात दररोज नवा वाद पाहायला मिळतोय. कधी कोण कुणाशी भांडेल, कधी काय होईल, कोण ग्रुप बदलेल काहीच सांगता येत नाही. यातच बिग बॉस मराठीच्या घरातील सुरुवातीपासून तयार झालेल्या दोन ग्रुपमध्ये वादाची ठिणगी पडली आणि हे ग्रुप आता विखुरले गेल्याचं चित्र पहायला मिळतय.