
९० च्या दशकात 'नवरी मिळे नवऱ्याला' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. आजही हा चित्रपट आवडीने पाहिला जातो. या चित्रपटाचा वेगळा असा प्रेक्षकवर्ग आहे. त्याकाळी अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी असे अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना दिलेत. या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीला एक नवीन अभिनेत्री मिळाली. सोबतच सचिन पिळगावकर यांना त्यांच्या आयुष्याची जोडीदार मिळाली. हा चित्रपट सुप्रिया पिळगावकर यांचा पहिला चित्रपट होता मात्र त्यांच्याआधी हा चित्रपट एका दुसऱ्याच अभिनेत्रीला ऑफर झाला होता. कोण होती ती अभिनेत्री?