jahnavi killekar
jahnavi killekaresakal

'बिग बॉस मराठी ५' फेम जान्हवी किल्लेकरची स्टार प्रवाहवर धमाकेदार एन्ट्री; झळकणार 'या' मालिकेत

Jahnavi Killekar New Serial: लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने 'बिग बॉस मराठी ५' संपल्यावर स्टार प्रवाहच्या मालिकेत दणक्यात एंट्री केली आहे.
Published on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' मधून घराघरात पोहोचणारी लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने तिच्या अभिनयाने खलनायिका म्हणून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. तिच्या बिग बॉसमधील वागण्यामुळे तिने प्रेक्षकांचा रोष ओढवून घेतलं होता. मात्र तिला तिची चूक कळली आणि आपल्या वागण्यात बदल करत तिने चूक सुधारली. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर ती कोणत्या मालिकेत दिसणार याची अनेकांना उत्सुकता होती. आता अखेर ती नव्या मालिकेत झळकायला सज्ज झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com