Bharat Ganeshpure Prajakta Hanamghar
Bharat Ganeshpure Prajakta Hanamgharesakal

Bharat Ganeshpure on Comedy Actors : "म्हणून सध्या विनोदी कलाकारांना खूप कामं.." भारत गणेशपुरे आणि प्राजक्ताने केलं स्पष्ट

Bharat Ganeshpure and Prajakta Hanamghar talk about comedy actors getting good roles in films : मराठी चित्रपटांमध्ये विनोदी कलाकारांना भूमिका मिळण्याचं कारण केलं स्पष्ट
Published on

'कॉमेडी एक्सप्रेस', 'कॉमेडीची बुलेटट्रेन' यासारख्या विनोद कार्यक्रमानंतर मराठी प्रेक्षकांसाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि चला हवा येऊ द्या यासारखे विनोदी कार्यक्रम हास्याची पर्वणी ठरले. या विविध कार्यक्रमातून ज्या कलाकारांनी त्यांचा उत्तम अभिनय आणि विनोदाचं उत्तम टायमिंग सादर केलं. या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पहोचले. हेच मराठी विनोदी कलाकार सध्या विविध चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. या विनोदी कलाकारांना चित्रपटांमधूनही पसंती मिळताना दिसतेय. 'पाणीपुरी' या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते भारत गणेशपुरे आणि अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांनी सकाळ माध्यमासोबत संवाद साधला.यावेळी त्यांनी सध्या विनोदी कलाकारांना मराठी चित्रपटांमध्ये मिळणार काम आणि महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी मत व्यक्त केलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com