

BHARAT KE SUPER FOUNDERS
ESAKAL
अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने त्यांच्या 'भारत के सुपर फाउंडर्स' या नवीन रिअॅलिटी सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. १६ जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या शोमध्ये बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी सूत्रसंचालक आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतातील छोट्या शहरांतील उद्योजकांना आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल.