
छोट्या पडद्यावर कोणताही नवा कार्यक्रम आला की प्रेक्षक त्याला डोक्यावर घेतात. त्या कार्यक्रमाला संधी देतात. मात्र मालिकेची कथा जर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली नाही तर मात्र ते कार्यक्रमाकडे पाठ फिरवतात. अशीच तऱ्हा कथाबाह्य कार्यक्रमांची देखील असते. छोट्या पडद्यावर एक अंगाला वेगळा विषय घेऊन आलेला 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम प्रचंड गाजला. सुरुवातीची ५ वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. मात्र नंतर प्रेक्षकांना विनोदांमध्ये तोचतोचपणा जाणवला आणि शेवटी हा कार्यक्रम अचानक बंद झाला. आता या कार्यक्रमाचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र आता त्यानिमित्ताने भाऊ कदम यांची एक मुलाखत व्हायरल होतेय.