
तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनला 'पुष्पा २' चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हैदराबादमधील चिकलाडपल्ली पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार, या चेंगराचेंगरीमध्ये एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तिचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला आहे.