BB Marathi Online Trp: ऑनलाइन टीआरपीमध्ये 'बिग बॉस मराठी ५'चा जलवा, मालिकांना मागे टाकत पटकावलं 'हे' स्थान

Bigg Boss Marathi 5 Online Trp: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' ने आता ऑनलाइन टीआरपीमध्ये वरचं स्थान पटकावलं आहे.
bigg boss marathi 5 online trp
bigg boss marathi 5 online trpesakal
Updated on

लोकप्रिय मराठी कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ५' ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच वेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. टास्कसोबतच इव्हिक्शनचा खेळ हा चांगलाच रंगत आहे. मात्र त्यातही अरबाज, निकी, जान्हवी आणि वैभव यांच्या ग्रुपने सगळ्यांच्या नाकात दम केला आहे. सोशल मीडियावर यावरून जोरदार खडाजंगी रंगली असली तरी कार्यक्रमाच्या टीआरपीला त्याचा फायदा झालेला दिसून येतोय. गेल्या आठवड्यात या कार्यक्रमाने इतर मालिकांना मागे टाकत थेट टॉप ५ मध्ये मजल मारली आहे. पाहा बिग बॉस मराठीने नेमकं कितव्या स्थानावर आहे.

कोण कितव्या स्थानावर?

ऑनलाइन टीआरपी म्हणजे प्रेक्षक ऑनलाइन जे कार्यक्रम पाहतात त्याची यादी. यावरून मोबाईलवर सगळ्यात जास्त कोणता कार्यक्रम पाहिला जातो याबद्दल माहिती मिळते. आता या यादीत सगळ्या कार्यक्रमांचं स्थान वरखाली झालं आहे. ऑनलाइन टीआरपी यादीत पहिल्या स्थानावर 'ठरलं तर मग' हा कार्यक्रम आहे. तर दुसऱ्या स्थानावर प्रेमाची गोष्ट आहे. तिसऱ्या स्थानावर लक्ष्मीच्या पाउलांनी' या मालिकेने पाय रोवले आहेत. मात्र गेल्या आठवड्यात सातव्या स्थानावर असणाऱ्या 'बिग बॉस मराठी ५' ने या आठवड्यात चौथ्या स्थानावर उडी घेतली आहे. त्यामुळे इतर सगळ्याच मालिका एक क्रमांक खाली उतरल्या आहेत.

'थोडं तुझं थोडं माझं' ही मालिका पाचव्या क्रमांकावर आणि 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका 'सहाव्या स्थानावर घसरली आहे. अशातच 'बिग बॉस मराठी सीझन ५' ने स्वतःचाच ऑनलाइन टीआरपीचा रेकॉर्ड मोडला असल्याचा दिसत आहे. या सगळ्यात टीव्हीवरील टीआरपीमध्ये 'बिग बॉस मराठी ५' कोणत्या स्थानी दिसणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

bigg boss marathi 5 online trp
Paaru: पारू जोमात, सगळे कोमात! शरयू सोनावणेचा हलगीच्या तालावर कमाल डान्स, नेटकरीही झाले फिदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com