

TANVI KOLTE IN BBM6
ESAKAL
'बिग बॉस मराठी ६' मध्ये आता नवनव्या सदस्यांची एंट्री होतेय. प्रेक्षक या सीझनमध्ये नेमकं कोण कोण असणार आहे हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. आतापर्यंत सोनाली राऊत, सचिन कुमावत, दीपाली सय्यद, आणि सागर कारंडे यांची 'बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री झालीये. मात्र त्यांच्या पाठोपाठ एका जोडीने घरात प्रवेश केलाय. त्या जोडीतील पहिला अभिनेता म्हणजे मालिका विश्वातील गाजलेला अभिनेता आयुष संजीव आहे. आयुष हा 'बॉस माझी लाडाची या मालिकेत दिसला होता. तर त्याच्यासोबत 'लक्ष्मीनिवास' या मालिकेतील अभिनेत्री आहे.