Big Boss Marathi 6 : प्रेमाची कबुली दिल्यानंतरच नात्यात दुरावा? बिग बॉस ६च्या नव्या प्रोमोने विशाल–रुचिताच्या नात्यावर प्रश्नचिन्ह
Vishal and Ruchita : बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा नात्यांमध्ये खळबळ उडाली आहे. बिग बॉस ६ च्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. विशाल–रुचिताच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे संकेत मिळत असून घरात नॉमिनेशन टास्कमुळे तणाव वाढला आहे.
बिग बॉस ६ च्या घरामध्ये दररोज काही ना काही नवीन ड्रामा पाहायला मिळतो. घरातील खेळ असो किंवा स्पर्धकांच्या नात्यांमधील बदल असो, प्रत्येक दिवशी काहीतरी घडतच असते. घरातील ग्रुप्समध्येही सतत बदल होताना दिसत आहेत.