
'बिग बॉस मराठी ४' मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अक्षय केळकर याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याने 'बिग बॉस मराठी ४' चं विजेतेपद पटकावलं. 'ढोलकीच्या तालावर' या कायक्रमात तो सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसला. मात्र त्याच्या रमाविषयी कायमच चाहत्यांमध्ये चर्चा राहिली त्याचं कारण म्हणजे 'बिग बॉसच्या घरात तो कायम तिच्याबद्दल बोलायचा. तिने आपल्याला खूप साथ दिलीये असं म्हणायचा. आता अखेर त्याने सगळ्यांना त्याच्या रमाचा चेहरा दाखवला आहे.