
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस मराठी' च्या ५ व्या सीझनमध्ये सहभागी झालेला छोटा पुढारी कायम सोशल मीडियावर चर्चेत असतो. बिग बॉसमुळे त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली. तो घराघरात लोकप्रिय झाला. आता पुन्हा एकदा घनश्याम चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. त्याचं कारण आहे त्याने शेअर केलेला नवीन व्हिडिओ. त्याने निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यासाठी एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तो त्यांच्यावर रागावलेला दिसतोय. त्यांनी आपलं वचन पाळलं नाही असं तो या व्हिडिओमध्ये म्हणतोय. नेमकं काय घडलं?