
बिपाशा बासू ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला बॉलिवूडची हॉरर क्वीन म्हटलं जातं. बिपाशाचे भयपट प्रचंड गाजले. याची सुरुवात 'राझ' चित्रपटापासून झाली. त्यानंतर तिने अनेक भयपटात काम केलं. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिच्या स्टाइलचे अनेक चाहते आहेत. मात्र बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीशी तिचा ३६ चा आकडा आहे. गेली २५ वर्ष हे भांडण सुरूच आहे. कोण आहे ती अभिनेत्री आणि का झालेला तिच्यासोबतचा वाद. चला जाणून घेऊया.