
Bollywood Entertainment News : एका काळी आपल्या बोल्ड लुक्स आणि हटके फॅशनमुळे चर्चेत असलेली बिपाशा बसू सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असून आपल्या मुलीच्या संगोपनात व्यस्त आहे. मात्र नुकत्याच झालेल्या एका फॅमिली आउटिंगमध्ये तिच्या कपड्यांवरून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये बिपाशाने शॉर्ट लूज ड्रेसवर लाँग व्हाईट शर्ट परिधान केला होता आणि त्यासोबत हिल्स व पर्स कॅरी केली होती.