Dharmaveer 2 : "मी आधी धर्मवीरचा पहिला भाग बघणार..." ; धर्मवीर २ चं पोस्टर अनावरण करताना बॉबी देओलने केलं टीमचं कौतुक

Bobby Deol Praised Dharmaveer Movie Cast : अभिनेता बॉबी देओलने 'धर्मवीर २' सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण केलं. यावेळी त्याने सिनेमाच्या टीमचं कौतुक केलं.
Dharmaveer 2
Dharmaveer 2Esakal

Bobby Deol : अभिनेता बॉबी देओलने धर्मवीर २ च्या पोस्टर लाँचला हजेरी लावली. त्याच्याबरोबर अशोक सराफ, सचिन पिळगावकर ही दिग्गज मंडळीही उपस्थित होती. बॉबीच्या हस्ते या सिनेमाचं पोस्टर अनावरण करण्यात आलं. यावेळी बॉबीने सिनेमाच्या टीमचं आणि खासकरून अभिनेता प्रसाद ओकचं खूप कौतुक केलं.

काय म्हणाला बॉबी ?

दिग्गजांच्या हस्ते पार पडलेल्या 'धर्मवीर २' सिनेमाच्या पोस्टर लाँचला अॅनिमल फेम बॉबी देओलने हजेरी लावली. यावेळी बॉबीने सिनेमाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं. इट्स मज्जा चॅनेलने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला होता. बॉबी म्हणाला,"मी हा माझा सन्मान समजतो कि तुम्ही मला या सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण करण्यासाठी बोलवलं. धर्मवीर सिनेमाचा सिक्वेल २ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होतोय आणि माननीय मुख्यमंत्री सर तुमचे अभिनंदन कि, तुम्हाला मुख्यमंत्री बनून दोन वर्षं झाली. किती लवकर हा काळ उलटून गेला कळलं नाही. मी या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. मी प्रसाद यांनी ही भूमिका खूप उत्तम रित्या साकारल्याचं ऐकलं आहे आणि माझ्या मते चरित्रभूमिका साकारणं खूप कठीण असतं. मी इतर सगळ्यांकडून तुमच्या अभिनयाबद्दल, परफॉर्मन्सबद्दल खूप ऐकलंय तर आता मला नक्कीच सिनेमाचा पहिला भाग बघावा लागणार आहे आणि त्यानंतर मी सिनेमाचा दुसरा बघेन. सिनेमाच्या सगळ्या टीमला खूप शुभेच्छा असंच काम करत राहा. "

खास पाहुण्यांची हजेरी

९ ऑगस्टला क्रांती दिनाचं औचित्य साधून धर्मवीर २ हा सिनेमा रिलीज होणार आहे. मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, बॉबी देओल यांच्या हस्ते सिनेमाच्या पोस्टरचं अनावरण झालं. तर या सोहळ्याला सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. याशिवाय या सिनेमाची टीम उपस्थित होती.

Dharmaveer 2
Dharmaveer 2: तो अंधारामध्ये चालत आला अन्... मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला प्रसाद ओकचा रंजक किस्सा

सिनेमाची टीम

'धर्मवीर २' मध्ये अभिनेता प्रसाद ओक पुन्हा एकदा धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणार असून अभिनेता क्षितीश दाते एकनाथ शिंदे यांच्या तरुणपणीची भूमिका साकारणार आहे. प्रवीण तरडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून मंगेश देसाई यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Dharmaveer 2
Dharmaveer 2: 'धर्मवीर 2' मध्ये एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्याने शेअर केली शूटींगची झलक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com