
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केलीये. बॉलिवूडमध्ये हटके भूमिका करणाऱ्या सोनू सूदच्या आयुष्यात मोठं वादळ आलंय. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठी बातमी समोर येतेय. सोनू सूद याची पत्नी सोनाली सूद हिचा मोठा अपघात झाला आहे. सोनाली हीचा मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झालाय. यात सोनाली गंभीर जखमी झालीये. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज २५ मार्च २०२५ रोजी घडली असून सोनाली सूदच्या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.