
गेल्या काही महिन्यांपासून आपल्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत असलेली लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आई झालीये. तिने लग्न झाल्यानंतर सातव्या महिन्यातच मुलाला जन्म दिलाय. चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ही अभिनेत्री आहे 'सिंग इज ब्लिंग' या चित्रपटात अक्षय कुमारसोबत झळकलेले अभिनेत्री अॅमी जॅक्सन. अॅमीने सात महिन्यांपूर्वी ब्रिटिश अभिनेता आणि संगीतकार एडवर्ड जॅक पीटर वेस्टविकशी थाटामाटात लग्न केलेलं. ३२ वर्षाची असणारी अॅमी आता आई झाली आहे. तिने तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म दिलाय.