

celina jaitley
ESAKAL
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली सध्या तिच्या भावाच्या अटकेमुळे चर्चेत आहे. सेलिना हिचा भाऊ, निवृत्त मेजर विक्रांत कुमार जेटली, यांना सप्टेंबर २०२४ पासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये ताब्यात घेण्यात आलं आहे. भावासाठी सेलिनाने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विक्रांत गेल्या १४ महिन्यांहून अधिक काळ अटकेत असून, भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने आवश्यक कायदेशीर आणि वैद्यकीय मदत पुरवावी, अशी मागणी सेलिनाने दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे.