
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत अशा अभिनेत्री आहेत ज्या लग्नानंतर मोठ्या आणि छोट्या पडद्यावरून गायब होतात. लग्नानंतर या अभिनेत्री सिनेसृष्टीपासून दूर जातात. घर संसारात रमतात. काही मुलांसाठी आपल्या करिअरवर पाणी सोडतात. आता अशीच लग्नानंतर करिअरपासून दुरावलेली लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झालीये. राज घराण्यातुन आलेल्या या अभिनेत्रीने भारतीय क्रिकेटपटूसोबत लग्न केलं होतं. आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालीये.