

VIDYA BALAN OMKAR BHOJANE SKIT
ESAKAL
आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने फक्त मराठी प्रेक्षकांनाच नाही तर बॉलिवूड कलाकारांनादेखील वेड लावलंय. बॉलिवूड कलाकार देखील हास्यजत्रेचे फॅन आहेत. त्यातलीच एक फॅन म्हणजे विद्या बालन. यापूर्वीही विद्याने अनेकदा मजेशीर रील शेअर केलेत. आता विद्याने आणखी एक धम्माल रील शेअर केलाय जो हास्यजत्रेतील कलाकार ओंकार भोजनेच्या गाजलेल्या संवादावर आहे. तिचा हा रील चांगलाच गाजतोय.