
बॉलिवूड कलाकारांचे घटस्फोट हे काही प्रेक्षकांसाठी नवीन नाहीत. गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक घटस्फोट झालेत. अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर या कलाकारांनी आपल्या पार्टनरपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता या यादीत आणखी एक नाव घ्यावं लागेल. आता आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीचा संसार तुटण्याच्या मार्गावर आहे. मागील काही दिवसांपासून लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी ही तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 'कोई मिल गया' मधून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारी हंसिका आता पतीपासून विभक्त झाली आहे. तिने तिच्याच जवळच्या मैत्रिणीच्या पतीसोबत लग्न केलं होतं.