संगीत जगतातील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार जोडी सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर यांनी त्यांच्या आयुष्यातील एक सुंदर अध्याय सुरू केला आहे. दोघेही आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या गरोदरपणाची बातमी दोन महिन्यांपूर्वीच आली होती आणि आता या जोडप्याने एका व्हिडिओद्वारे बाळाच्या जन्माची घोषणा केली आहे.