
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालणाऱ्या सिनेसृष्टीतील 'चांदनी' म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांचं २०१८ साली अपघाती निधन झालं. त्या दुबईला एका लग्नाला गेल्या असताना त्यांच्या हॉटेलच्या बाथटबमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्या चक्कर येऊन बाथरूममध्ये पडल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र ही घटना घडली तेव्हा त्यांचे पती बोनी कपूर त्याच रूममध्ये होते. त्यामुळे त्यांच्यावर संशयाची सुई रोखली गेली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोनी यांनी श्रीदेवी यांच्या मृत्यूचं खरं कारण सांगितलंय.