
चित्रपट निर्माते बोनी कपूर नेहमीच आपल्या भावांबद्दल बोलताना दिसतात. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी त्यांच्या भावांचे असे किस्से सांगितले आहेत जे ऐकून समोरचा पोट धरून हसू लागतो. बोनी कपूर हे त्यांच्या खास स्टाइलसाठी ओळखले जातात. बोनी कपूर निर्माता आहेत, तर त्यांचे भाऊ अनिल कपूर आणि संजय कपूर अभिनेते आहेत. नुकत्याच एबीपी लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत बोनी यांनी भाऊ अनिल यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला आहे जेव्हा त्यांनी 2-3 दिवस अंघोळच केली नव्हती.