

border 2 twitter review
ESAKAL
अनेक महिने प्रेक्षक 'बॉर्डर २' चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर २३ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिवसाच्या काही दिवस आधी हा राष्ट्रभक्तीपर चित्रपट प्रदर्शित झालाय. यात अभिनेता सनी देओल मुख्य भूमिकेत आहे. तर या चित्रपटातून तो पुन्हा एकदा युद्धाच्या मैदानावर दिसणार आहे. त्याच्यासोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत. जे पी दत्ता यांच्या १९९७ साली आलेल्या बॉर्डर या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटाची जेवढी गाणी प्रदर्शित झाली ती ऐकून प्रेक्षकांनी हा चित्रपट चांगला असेल असा अंदाज लावला होता. आता पाहूया या चित्रपटाबद्दल प्रेक्षक काय म्हणतायत.