

case no. 73
esakal
प्रत्येक चेहऱ्यावर एक मुखवटा असतो आणि या मुखवट्यामागे असतात सुखदुःखाच्या असंख्य मानवी भावभावना.. ज्या आपल्याला कधीच दिसत नाही, आणि सोबत मुखवट्यामागे दडलेली अनेक रहस्य..!! या मुखवट्यामागचा खरा चेहरा समोर आला की आपणही चक्रावून जातो... अशीच एक चक्रावून टाकणारी कथा घेऊन येत आहे ‘केस नं. ७३’. ना चेहरा, ना निमित्त, चार खून, शून्य पुरावे.... अशा टॅगलाईनसह आलेल्या ‘केस नं. ७३’ चित्रपटाचे मोशन पोस्टर आपल्यासमोर असंख्य प्रश्न उभं करतं.