

ajay purkar case no. 99
esakal
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे अजय पुरकर आता दिग्दर्शनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. अजय पुरकर आणि सई अजय पुरकर दिग्दर्शित ‘केस नं. ९९’ या आगामी मराठी सस्पेन्स-थ्रिलरचा ट्रेलर आणि पोस्टर आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात नवी वाटचाल सुरू करत अजय पुरकर यांनी एका रहस्यमय आणि उत्कंठावर्धक कथेला पडद्यावर मांडले आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर १६ ऑक्टोबर २०२६ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे.