Anant & Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या हळदीत बॉलिवूड सेलिब्रिटीजची धमाल ; रणवीरचा अवतार बघून नेटकरी चकित

Anant & Radhika Haldi Ceremony : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा हळदी समारंभ थाटात पार पडला. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली.
Anant Radhika Haldi
Anant Radhika HaldiEsakal

Anant Ambani & Radhika Merchant : सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची सगळीकडे चर्चा आहे. नुकताच या दोघांचा हळदी समारंभ थाटात पार पडला. या कार्यक्रमाला त्या दोघांच्या कुटूंबाबरोबर अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावत धमाल केली.

Anant Radhika Haldi
Anant-Radhika Sangeet: संगीत समारंभात अनंत-राधिकाचा शोभून दिसला जोडा

या हळदी समारंभाला हजर असलेल्या कलाकारांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अभिनेता सलमान खानने हळदीला निळ्या रंगाचा कुर्ता घातलेला पाहायला मिळाला पण बाहेर पडताना त्याच्या अंगावर पिवळ्या रंगाचा कुर्ता होता यावरून त्याने कुर्ता बदलला असावा अशी चर्चा सगळीकडे आहे तर त्याच्या चेहऱ्याला बरीच हळद लागली होती.

पण सगळ्या पापराझिंचं लक्ष वेधून घेतलं ते अभिनेता रणवीर सिंहने. रणवीर पूर्ण हळदीने माखला होता. त्याच्या संपूर्ण कुर्त्यावर, चेहऱ्यावर बरीच हळद लागलेली होती. त्याच्या या लुकवरून त्याने हळदीत खूप धमाल केली असल्याचं समोर येतंय. तसंच त्याचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय ज्यात तो पान खाताना दिसतोय.

अनंत राधिकाच्या हळदीला राधिकाच्या खास मैत्रिणी जान्हवी, सारा आणि अनन्यानेही हजेरी लावली होती. साराने रंगीबेरंगी लेहेंगा घातला होता तर जान्हवी पिवळ्या रंगाचा साडीमध्ये सुंदर दिसत होती. तर अनन्या पांडेने पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता. त्यांचे लूक नेटकऱ्यांना खूप आवडली. या व्यतिरिक्त अनंतची काकू आणि अनिल अंबानीची पत्नी टीना अंबानी आणि त्यांच्या सुनेने हजेरी लावली.

12 जुलै मुंबईमधील जिओ काँव्होकेशन सेंटरमध्ये अनंत राधिकाचा विवाहसोहळा पार पडणार आहे. यावेळी देश-परदेशातील अनेक दिग्गज मंडळी हजेरी लावणार आहेत.

Anant Radhika Haldi
Anant & Radhika Wedding : ग्रँड संगीतानंतर अंबानींच्या घरी पार पडली ग्रह शांती पूजा ; राधिकापेक्षा 'या' व्यक्तीची होतेय चर्चा !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com