
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत कथाबाह्य कार्यक्रमही गणले जातात. झी मराठी गेली अनेक वर्ष उत्तमोत्तम कथाबाह्य कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. त्यातील एक गाजलेला कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. या कार्यक्रमाने तब्बल १० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. २०१४ ते २०२४ ही दहा वर्ष हा कार्यक्रम अविरतपणे चालू होता. मात्र कार्यक्रमात एकसुरीपणा, तोचतोचपणा येऊ लागल्याने वाहिनीने कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.