

मुंबई : मराठा साम्राज्याचा शौर्यगाथा उलगडणारा 'छावा' (Chhaava) चित्रपट बॉक्स ऑफिसवर वादळासारखा धडका देत आहे. विक्की कौशलने (Vicky Kaushal) साकारलेला संभाजी महाराजांचा दमदार अभिनय आणि चित्रपटातील ऐतिहासिक पार्श्वभूमी प्रेक्षकांना खूपच भावली आहे. रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत अप्रतिम अभिनय साकारला आहे.